अंबरनाथ: अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिर परिसर सुशोभीकरणाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ३ मार्चला होणार आहे. अंबरनाथचे पुरातन शिवमंदिराचे सुशोभीकरण संदर्भात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथमध्ये माहिती दिली.
शिवमंदिर परिसर सुशोभीकरण करण्यासाठी तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १५० कोटी रुपये मंजूर केले होते. या निधीमधून संपूर्ण मंदिर परिसराचा कायापालट करण्यात येणार आहे. भूमिपूजनाचा कार्यक्रम ३ मार्चला झाल्यानंतर सुशोभीकरण कामाला गती येणार आहे. येत्या दोन ते तीन वर्षांत हे काम पूर्ण होईल, असा विश्वास खासदार शिंदे यांनी व्यक्त केला. या वेळी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, शहरप्रमुख अरविंद वाळेकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी उपस्थित होते.
2,506 Less than a minute