A2Z सभी खबर सभी जिले की

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना नागपूर जिल्हा तर्फे रविवार 5 ऑक्टोबर 2025 ला लोकार्पण व सत्कार सोहळा सेवासदन

प्रेस नोट
सेवासदन जटार सभागृह,झाशी राणी चौक
सीताबर्डी, नागपूर

“अशोक स्पर्श” ग्रंथांचे विमोचन

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना नागपूर जिल्हा तर्फे रविवार 5 ऑक्टोबर 2025 ला लोकार्पण व सत्कार सोहळा सेवासदन जटार सभागृह, झाशी राणी चौक, सीताबर्डी येथे संपन्न झाला. सभेचे अध्यक्ष विश्वास काटकर अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष, लोकार्पण डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी माजी अध्यक्ष मराठी साहित्य महामंडळ, प्रमुख पाहुणे जि. प महासंघ अध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, चतुर्थश्रेणी महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण, मध्यवर्ती संघटनेचे संघटक सुबोध किर्लोस्कर आणि सत्कार मूर्ती अशोक दगडे सपत्निक विजया दगडे यांच्या सोबत मंचावर उपस्थित होते.

अशोक दगडे त्यांचावर आधारित गौरव ग्रंथाचे प्रकाशन डॉ. श्रीपाद जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. तर सत्कार विश्वास काटकर यांच्या हस्ते करण्यात आला.

गौरव ग्रंथ ज्यांनी संपादन केले त्यांची भूमिका प्रा. युवराज गंगाराम यांनी मांडली. अशोक स्पर्श नाव का ठेवण्यात आले याची माहिती त्यांनी दिली.

अशोक स्पर्श या गौरव ग्रंथावर बोलताना श्रीपाद म्हणाले की, ज्यांच्यावर ग्रंथ तयार केला ते मला आज साहित्यिक वाटत आहे. सामाजिक चळवळीत कामाकरीता काम करीत असताना त्यांनी आपले आरोग्यही जपले. आणि येणाऱ्या पिढीला या ग्रंथातून अनेक संदर्भ प्रेरणादाई ठरणार.

अशोक स्पर्श ग्रंथाची सर्वांनीच प्रशंसा केली.

या कार्यक्रमाचे संचालन रमेश राठोड यांनी केले तर,आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर महल्ले यांनी केले. या सोहळ्याला विदर्भातून मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते, नातेवाईक, मित्रपरिवार उपस्थित होते.

RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
Vande bharat live tv news,nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!