A2Z सभी खबर सभी जिले कीTechnologyअन्य खबरेमहाराष्ट्र

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, बल्लारपूर येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागाची औद्योगिक भेट

संजय पारधी बल्लारपूर महा.
बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, बल्लारपूर येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागाची औद्योगिक भेट बल्लारपूर येथील प्रीती अँड प्रशांत पाईप उद्योगाला देण्यात आली. या उद्योगाची कच्चा माल खरेदी ते वस्तू विकण्यापर्यंतची संपूर्ण विस्तृत माहिती येथील व्यवस्थापक व पर्यवेक्षकांनी विद्यार्थ्यांना दिली. सदर उद्योगाची उत्पादन प्रक्रिया प्रत्यक्षरित्या विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली. अशाप्रकारच्या उद्योगाच्या भेटीतून विद्यार्थ्यामध्ये नव नवीन उद्योजक निर्मिती चि प्रक्रिया सुरु होते. असे मत प्रा. डॉ. रोशन फुलकर वाणिज्य व व्यवस्थापन शाखा प्रमुख यांनी मांडले. विद्यार्थी जीवनात औद्योगिक सहलीतून त्यांच्यातील सुप्त गुणांना चालना मिळते असे मत प्रा. डॉ. विनय कवाडे यांनी मांडले. सदर औद्योगिक भेट प्रा. डॉ. रोशन फुलकर व प्रा. डॉ. विनय कवाडे यांच्या मार्गदर्शनात पार पाडली. यावेळेस वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Back to top button
error: Content is protected !!