A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेपुणेमहाराष्ट्र

पुणे महानगरपालिकेतील ठेकेदाराचा मनमानी कारभार नागरिकांच्या जीविताशी खेळ पालिका अधिकाऱ्यांच दुर्लक्ष

कात्रज चौक ते गुजरवाडी फाट्यापर्यंतचा रस्ता पावसाळी लाईनसह डांबरीकरण करणे व तंदनुषगिक काम करण्यासाठी जॅक्सन बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून काम देण्यात आलेले असून या कामावरती पथ विभागाचे नियंत्रण आहे. या रस्त्यावर गेल्या दोन महिन्यापासून सुरक्षेची कुठलीही उपाययोजना न करता सदर काम काही काळ सुरू करून गेल्या दोन महिन्यापासून बंद असल्याचे आढळून आले आहे. कात्रज सातारा रोड हा दुहेरी वाहतूक करणारा अरुंद मार्ग असून या रस्त्यावरून पुणे शहरांमध्ये येणारी व पुणे शहरांमधून जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्याने खूप मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते त्यामध्ये या पावसाळी लाईनच्या अर्धवट कामामुळे रस्त्यावर पडलेला रडारोड्यामुळे मोठ्या प्रमाणात दैनंदिन ट्रॅफिक जामची समस्या उद्भवत असून या ठिकाणी दुर्घटनाही झाल्याचे स्थानिक नागरिकांकडून माहिती मिळाली आहे. सर्रासपणे नागरिकांच्या जीविताशी खेळण्याचा प्रकार या रस्त्यावर होत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. पुणे महानगरपालिका पथ विभाग अधिकारी यांच्या माध्यमातून यावर काय उपायोजना करून संबंधित ठेकेदारावर काय कारवाई केली जाते असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. 

संबंधित वरील कामकाजाच्या प्रकाराविषयी माहिती पुणे महानगरपालिका पथ विभाग मा. उपअभियंता श्री दिलीप पांडकर, कनिष्ठ शाखा अभियंता श्री कुणाल यादव तसेच पुणे ट्राफिक डीसीपी अमोल झेंडे यांना माहिती देण्यात आलेली असून संबंधित प्रकाराविषयी योग्य ती दखल घेऊन नागरिकांना होणाऱ्या नाहक त्रासापासून मुक्तता मिळावी अशी स्थानिकांची मागणी करण्यात येत आहे.

Back to top button
error: Content is protected !!