
समीर वानखेडे:
भुमी अभिलेख कार्यालयाचे काम हे मोजणी संदर्भात असून येथील अधिकारी व कर्मचारी असे एकूण 4 जण 20 जून 2025 रोजी मोजणीच्या तसेच सनद वसुलीच्या कामावर होते. लखमापूर येथील सत्यपाल थिपे हे सदर दिवशी कार्यालयात नकला घेण्यासाठी आले असता त्यांना उपलब्ध मनुष्यबळाच्या माध्यमातून अभिलेखाची नक्कल त्याच दिवशी देण्यात आली, असे स्पष्टीकरण कोरपना येथील भुमी अभिलेख विभागाचे उपअधिक्षक प्र.ना. बढीये यांनी दिले आहे.
सदर कार्यालयाच्या आस्थापनेच्या तक्याप्रमाणे एकूण 4 कर्मचारी मोजणीवर सनद वसुली करण्याकरीता दौऱ्यावर होते. तसेच रजेवर/गैरहजर /सेवावर्ग असलेले 5 कर्मचारी आहेत आणि कार्यालयात 3 कर्मचारी उपस्थित होते. 3 शिपाई पदे रिक्त असून एकूण 15अधिकारी कर्मचारी यांची आस्थापना आहे. अर्जदार सत्यापाल भाऊजी थिपे रा. लखमापूर हे 20 जून 2025 रोजी अभिलेखाचे नकला घेण्यासाठो कार्यालयात आले होते. त्यांच्यासोबत इतर धारकही कार्यालयामध्ये हजर होते. कार्यालयात हजर असलेले छाननी लिपीक वसंत जाधव यांना सदर धारकांच्या नकलाचे काम तात्काळ काम करून देण्याबाबत तोंडी सुचना देण्यात आल्या. त्याप्रमाणे जाधव यांनी नकला करण्यास सुरुवात केली.
श्री. थिपे यांच्यासोबत आलेल्या व्यक्तिंनी सदर नक्कल लवकरात लवकर देण्याची मागणी केली. भूकरमापक श्री. घोंगे हे सनद वसुलीवर गेले होते. ते आल्यानंतर त्यांची स्वाक्षरी घेऊन नकला देण्याची अर्जदार यांना विनंती केली. मात्र अर्जदार हे काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी मुख्यालय सहाय्यक यांच्या खाली रूमचा फोटो घेतला. वास्तविक पाहाता अर्जदार सत्यापाल थिपे यांना सदरची नक्कल त्याच दिवशी देण्यात आली व इतर अर्जदारांना सुध्दा नकला देण्यात आले. त्यांचा अर्ज या कार्यालयात शिल्लक नाही. यात कार्यालयाची कोणत्याही प्रकराची चुक नाही.
कार्यालय खाली राहण्याचे कारण की, आस्थापना तक्ताप्रमाणे मोजणीवर व सनद वसुली करीता गेलेले कर्मचारी, सेवावर्ग, गैरहजर असलेले आणि रिक्त पदे असलेले कर्मचारी यांची एकूण संख्या 12 असून सदर दिवशी कार्यालयात फक्त 2 कर्मचारी व 2 कार्यालय प्रमुख हजर होते, असे कोरपना भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधिक्षक श्री. बढीये यांनी कळविले आहे.