
प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर, नाशिक : भद्रकाली गुन्हे शोध पथकाने केलेल्या कारवाईत १५० किलो गोमांस आणि तीन गोवंश असा सुमारे ७५ हजारांचा ऐवज जप्त केला. भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी (ता. २५) सकाळच्या सुमारास छापा टाकून कारवाई करण्यात आली.
कुरेशी गल्ली येथे कत्तलीच्या इराद्याने गोवंश जनावरे बांधून ठेवण्याची माहिती कय्यूम सय्यद यांना मिळाली. त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार, पोलिस उपनिरीक्षक यशवंत गांगुर्डे, सतीश साळुंखे, कय्यूम सय्यद, नीलेश विखे, अविनाश जुंद्रे, नितीन भामरे, दयानंद सोनवणे यांनी त्याठिकाणी छापा टाकला.