A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेताज़ा खबर

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना परिवहन महामंडळाच्या वतीने 22 व 23 ऑगस्ट रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन


सुमिता शर्मा चंद्रपुर महाराष्ट्र:
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाद्वारे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून या योजनेअंतर्गत 12 पास विद्यार्थ्यांना प्रतिमाह 6 हजार रुपये, आय.टी.आय./ पदविका विद्यार्थ्यांना 8 हजार रुपये तर पदवीधर/ पदव्युत्तर विद्यार्थ्यांना दरमहा 10 हजार रुपये विद्यावेतन देण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत उमेदवारांना कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच राज्य परिवहन महामंडळ, ताडोबा रोड, तुकुम, चंद्रपूर येथे 22 व 23 ऑगस्ट रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टल वरून महामंडळाला अर्ज सादर केलेले आहेत, त्यांनी सुद्धा सदर तारखेला संपूर्ण शैक्षणिक मूळ कागदपत्रासह उपस्थित रहावे. तसेच इच्छुक उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात ऑफलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक स्मिता सुतवणे यांनी केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!