
संजय पारधी बल्लारपूर
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने ‘विद्यार्थी सुरक्षा ऐरणीवर’ गंभीर दखल घेऊन तालुका स्तरापासून ते राज्यस्तरापर्यंत विद्यार्थी व महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराबाबत शासनाला उपाययोजनांची त्वरित अंमलबजावणी करण्याबाबत सुचविले. हे निवेदन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिनांक 29ऑगस्ट 2024 ला माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष मा.विनोदजी पांढरे , विभागीय उपाध्यक्ष मा.मधुकर मुप्पिडवार ,विभागीय संघटक मा.रामदासजी गिरटकर ,जिल्हाध्यक्ष मा.विलास खोंड ,कार्यवाह मा.दिलीप म्याकलवार ,जिल्हा महिला आघाडी प्रमुख संध्या गिरडकर ,विभागीय महिला आघाडी प्रमुख सरिता सोनकुसरे ,वरोरा तालुका अध्यक्ष वीणा आंबटकर , चिमूर तालुका महिला आघाडी शीतल पिसे, भद्रावती तालुका महिला आघाडी प्रमुख स्मिता चामाटे ,कॉन्व्हेन्ट प्रमुख मा.विवेक आंबेकर , विकास नंदुरकर, प्रदीप रत्नावार प्रामुख्याने उपस्थित होते.