A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

अकृषी विद्यापीठांच्या आर्थिक स्वायत्ततेसाठी मार्गदर्शक ठरणारा समिती अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर

अकृषी विद्यापीठांच्या आर्थिक स्वायत्ततेसाठी मार्गदर्शक ठरणारा समिती अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर

          प्रेस विज्ञप्ति 
           मुंबई 

अकृषी विद्यापीठांच्या आर्थिक स्वायत्ततेसाठी मार्गदर्शक ठरणारा समिती अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर

राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने आपला अंतिम अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज मुंबई येथे सादर केला. या समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव यांच्यासह समितीत डॉ. अजित रानडे, प्रा. अभय पेठे, विश्वनाथ गिरीराज आणि डॉ. विशाल गायकवाड यांचा समावेश आहे. समितीचा अभ्यास गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेच्या वतीने करण्यात आला.

समितीने उच्च शिक्षण संस्थांना जागतिक पातळीवर निधी कसा मिळतो?, राज्यातील संस्थांना सध्या निधी मिळविण्याची प्रक्रिया कशी आहे?, यातील असमानता आणि विसंगती कोणत्या आहेत? याचा सविस्तर अभ्यास केला. विद्यमान आर्थिक स्थिती, तूट भरून काढण्याचे उपाय, भागीदारी व गुंतवणुकीद्वारे निधी उभारण्यास प्रोत्साहन, तसेच पर्यायी वित्तीय मॉडेलचा प्रवेश क्षमता, गुणवत्ता आणि शैक्षणिक शुल्कावर होणारा परिणाम यांचा परिपूर्ण आढावा समितीने घेतला आहे.

अभ्यासाच्या प्रक्रियेत समितीने राज्यातील अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू, संस्था प्रमुख यांच्याशी थेट संवाद साधला. उत्पन्नवाढीसाठी नवीन मार्ग, इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणे, शासकीय अवलंबित्व कमी करण्यासाठी जमीन, पायाभूत सुविधा व बौद्धिक संपदांचे मॉनेटायझेशन यावरही उपाय सुचवले गेले आहेत.या अहवालातून राज्यातील उच्च शिक्षण संस्थांना स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने सरकारला ठोस दिशादर्शक मिळणार असून, धोरणनिर्मिती आणि अंमलबजावणीत याचा मोलाचा उपयोग होणार आहे.

 Vande bharat Live tv news nagpur 
          Editor 
 Indian Council of press,Nagpur
         Journalist

Contact no.9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015

Back to top button
error: Content is protected !!