जळगांव :- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी जळगांव जिल्हा पोलीस मित्र समिती मार्फत पोलीस प्रशासनाला सहकार्य म्हणून बंदोबस्तकामी पाचोरा शहर येथील पोलीस मित्रांनी पहिल्या दिवसापासून उत्कृष्ट सहकार्य केले. निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करणेकामी जळगांव जिल्हा पोलीस मित्र समिती यांच्यामार्फत जिल्हाध्यक्ष श्री. राहुल खेवलकर यांच्या मार्गदर्शनाने पाचोरा तालुका अध्यक्ष मा. भाग्येश मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस मित्र सदस्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी प्रथम दिवसापासून पोलीस प्रशासनाला विविध स्तरावर बंदोबस्त आणि इतर प्रशासनिक कामे करण्यासाठी सहकार्य केले. त्यात रात्रीची गस्त, रूट मार्च, पोलिंग बूथ देखरेख अशी आणि इतर अनेक कामे पोलीस मित्र सदस्यांनी पार पाडली. याकामी पाचोरा तालुका अध्यक्ष मा. भाग्येश मोरे यांच्या अध्यक्षतेखाली मा. योगेश पवार, मा.दिपक पवार, मा.विकास परदेशी,मा. आकाश पद्मे ,मा. लोकेश जैन, मा. चेतन कोळी, मा.मनीष कंडारे या पोलीस मित्राचे अनमोल सहकार्य मिळाले. भविष्यातदेखील पोलीस मित्र समिती जळगांव यांच्यामार्फत अनेक समाजोपयोगी कार्य पार पडतील अशी अपेक्षा सर्वसामान्यांनी आणि पोलीस बांधवांनी व्यक्त केली.
2,915 Less than a minute