पुणेः पालिकेने केला २८ हजाराचा दंड वसूल
शहरातील पारवे तसेच कबुतरांकडून होणारा त्रास दिवसेंदिवस अधिकच वाढत असल्याचे समोर आले आहे. नागरिकांनी पारव्यांना धान्य टाकू नये, असे आवाहन महापालिकेने केलेले असतानाही त्याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जात आहे. महापालिकेच्या आदेशाला केराची टोपली दाखविणाऱ्यांकडून महापालिकेने २८ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. शहरातील विविध भागांतून ३८ प्रकरणांमध्ये हा दंड वसूल करण्यात आला आहे.