
समीर वानखेडे चंद्रपूर महाराष्ट्र;
महाराष्ट्र पत्रकार संघ , बल्लारपूर तालुका शाखेच्या वतीने 6 जानेवारी रोजी सकाळी 11:30 वा संत तुकाराम सभागृह बालाजी वॉर्ड येथे , पत्रकार दिन व पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक , राजकीय , क्रीडा, कला , शिक्षण , उद्योग व ईतर क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात येत आहे .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी वने , सांस्कृतिक व माजी पालकमंत्री आ डॉ. सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहतील तसेच , भूमिपुत्र ब्रिगेड चे संस्थापक अध्यक्ष डॉ अभिलाषा गावतुरें उपस्थित राहतील, सोबतच विशेष अतिथी म्हणून मा अभय गायकवाड ,तहसीलदार बल्लारपूर , मा . विशाल वाघ मुख्याधिकारी नगरपरिषद बल्लारपूर , मा. सुनील गाडे पोलिस निरीक्षक बल्लारपूर आणि मा संजोग मेंढे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे .
तरी या कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने पत्रकार बंधू आणि सामान्य जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र पत्रकार संघ चे तालुका अध्यक्ष रमेश निषाद , उपाध्यक्ष शंतिकुमार गिर्मिल्ला , जिल्हाध्यक्ष मुन्ना खेडकर आणि समस्त महाराष्ट्र पत्रकार संघ च्या पदाधिकारी आणि सदस्यांनी केले आहे .