
मुंबई, ६ फेब्रुवारी, २०२४ : मनसे नेते बाळा नादंगावकर यांनी अयोध्येतील बाबरी मशिदीची एक वीट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेट म्हणून देण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी बाळा नादंगावकर यांच्याकडून राज ठाकरे यांना ही बाबरी मशिदीची एक वीट भेट देण्यात आली. यानंतर राज ठाकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे म्हणाले, ‘6 डिसेंबरला बाबरीचा ढाचा पडला, त्यावेळी महाराष्ट्रातून जे शिवसैनिक तिथे गेले होते, त्यात बाळा नांदगावकर होते. ढाचा पडल्यानंतर तिथे ज्या वीटा होत्या, त्यातल्या दोन वीटा बाळा नांदगावकर घेऊन आले होते. एक वीट त्यांच्याकडे आहे, आज दुसरी वीट त्यांनी भेट म्हणून दिली आहे.’तर बाळा नांदगावर यांनी त्यावेळीचा प्रसंग सांगितला. अयोध्येत कारसेवेला गेलो तेव्हा जिवंत येऊ की नाही हे माहित नव्हतं. तो प्रसंग आजही आठवला तरी…तो प्रसंग बाका होता. त्यावेळी फक्त जय श्रीरामच्या घोषणा ऐकू यायच्या. पण मझी एक इच्छा होती. जेव्हा राम मंदिर होईल तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी ती वीट द्यावी, पण आज 32 वर्षे झालेत आज बाळासाहेब ठाकरे नाहीत आमच्यादृष्टीने राज ठाकरेच आमचे बाळासाहेब