
पुणे पीएमपीएल सिटी बसची दुरावस्था असल्याचे चित्र वारंवार पुणे शहरातल्या अनेक रस्त्यावर दिसते अनेक रस्त्यावर अशा पीएमपीएलच्या बसेस आपल्या दुर्दैवी अवस्थेमुळे कधी गरम होऊन तर कधी वेगवेगळे कारणास्त रस्त्यामध्ये बंद पडतात व बी आर टी रोड ब्लॉक करतात तर कधी रस्त्याच्या किनारी बंद पडलेल्या पहायला मिळतात. असाच प्रकार 3 मार्च व 4 मार्च 2025 रोजी भारती विद्यापीठ समोरील बि आर टी रोडवर पाहायला मिळाला चालक व वाहक यांच्या मार्फत घेतलेल्या माहितीनुसार या बस गरम झाल्याने बंद पडल्याचे सांगण्यात आले. आत्ताच कुठे उन्हाळ्याची सुरुवात होत असून उष्णतेची लाट उसळण्याआधीच पी एम पी एल बसेसची ही अवस्था आहे तर या अवस्थेत रस्त्यावर चालू शकत नसलेल्या बसेस डेपो मधून बाहेर कशा पाठवल्या जातात याची चेकिंग कशा पद्धतीने होते? व अशा वाहनांची चौकशी संबंधित पीएमपीएल अधिकारी व आरटीओ किंवा ट्रॅफिक पोलिसांकडून होणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून प्रशासनाला विचारला जात आहे.

