
संजय पारधी बल्लारपूर महाराष्ट्र
बल्लारपूर :- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली व महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूरच्या संयुक्त विद्यमाने (PM-USHA) प्रधानमंत्री उच्चस्तर अभियान अंतर्गत एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा चे आयोजन दि.07 मार्च 2025 ला करण्यात आले होते. या कार्यशाळेची सुरुवात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व माता सरस्वती यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून झाली या कार्यशाळेला प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. विकास पुनसे, कार्यशाळा समन्वयक, (pm-usha), मा. प्रशांत भोरे, डॉ. रजत मंडल, प्रभारी प्राचार्य (कार्यशाळेचे अध्यक्ष) यांच्यासह डॉ. बालमुकुंद कायरकर, डॉ. पंकज कावरे, प्रा. ले. योगेश टेकाडे यांची विचार पिठावर उपस्थिती लाभली होती. कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. बालमुकुंद कायरकर करतांना विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही कार्यशाळा महत्वाची असून विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतांना आपल्या क्रेडिटवर लक्ष देण्याचे आवाहन केले व या कार्यशाळेत त्यावर मान्यवराचे मार्गदर्शन होणार आहे. यानंतर कार्यशाळा समन्वयक, (pm-usha) प्रा. विकास पुनसे मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणात खंड पडू न देता तंत्रज्ञानाचा वापर करावा तसेच नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना त्यांचं आवडीचं शिक्षण घेण्यास मुभा दिली असून विद्यार्थ्यांनी क्रेडिट वर भर द्यावा यानंतर कार्यशाळेचे प्रमुख अतिथी मा. प्रशांत भोरे यांनी डीजीलॉकर हे विद्यार्थ्यांच्या दृष्टींने कसे योग्य आहे. हे पटवून दिले. तसेच वर्तमान स्थितीत आपल्या दाखले व गुणपत्रिका तंत्रज्ञानाच्या स्वरूपात साठवण्याला महत्व प्राप्त आले आहे. यानंतर प्रा. ले. योगेश टेकाडे यांनी अकॅडमीक बँक ऑफ क्रेडिट वर मार्गदर्शन करतांना abc id चे महत्व विषद केले. तर प्रा. पंकज नंदुरकर यांनी विद्यार्थ्यांना डीजीलॉकर वर विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी कशाप्रकारे करावी याबद्दल मार्गदर्शन केले या कार्यशाळेचे संचालन प्रा. मोहनीश माकोडे तर आभार प्रदर्शन डॉ. पंकज कावरे यांनी केले या ऑनलाईन व ऑफलाईन असलेल्या कार्यशाळेला जवळपास 400 च्या आसपास विद्यार्थी व प्राध्यापक वर्गाची उपस्थिती होती.