A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेदेशमध्यप्रदेशमहाराष्ट्र

*ईव्हीएम विरोधात आवाज * गडकरी सभागृहात काशीराम जयंती साजरी: ओबीसी हक्कांसाठी एकजूट*


बहुजन नायक माननीय काशीराम यांच्या जयंतीचा कार्यक्रम गडकरी सभागृह येथे भारत मुक्ती मोर्चा तर्फे आयोजित केला होता या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित माजी मंत्री सुनील भाऊ केदार संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष दिनेश इंगोले विजयजी राजुरकर राज्य उपाध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी विकी बेलखेडे कार्याध्यक्ष बी एम पी महाराष्ट्र जय जिजाऊ हेमलता पाटील अनीलजी बोडखे राजेश जी काकडे राष्ट्रीय अध्यक्ष जनसुराज्य पक्ष दीपक जी ढोके एडवोकेट विलास खडसे अध्यक्ष रामटेक लोकसभा क्षेत्र या देशातील मनुवादी सरकार संविधानाला पायदळी तुडवत आहे या देशात कुत्र्या मांजराची गणना केल्या जाते पण बहुसंख्या असलेला ओबीसी समाज याची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे केंद्र सरकार राज्य सरकार ओबीसी समाजाविषयी बजेटमध्ये कोणतीही तरतूद करत नाही क्रमिक असामानाता या देशांमध्ये इथल्या व्यवस्थेने निर्माण केली आहे या देशातील जनतेची ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केंद्र सरकारला करणार असल्याचे माजी मंत्री माननीय सुनील केदार यांनी आपल्या भाषणात म्हटले त्याचप्रमाणे या देशातील निवडणुका ईव्हीएम च्या माध्यमातून होत आहे आणि जोपर्यंत या देशातून ईव्हीएम हद्दपार होत नाही तोपर्यंत सर्वसामान्य जनतेचे राज्य या देशात येणार नाही म्हणून जनतेने ईव्हीएम च्या विरोधात आता एकजुटीने लढा उभारला पाहिजे असे आवाहन माजी मंत्री सुनील भाऊ केदार यांनी याप्रसंगी केले कार्यक्रमाला बलराम चोरे अमोल रंगारी कांचन ढवंगाळे भगवान चांदेकर सुभाष मछले ज्योतीताई सोनटक्के विशाखापरी मंडळ कार्यकर्ते पदाधिकारी बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकर्ते भारत मुक्ती मोर्चाचे कार्यकर्ते संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Back to top button
error: Content is protected !!