
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहावा हप्ता निधी वितरण शेतक-यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी. एम. किसान) योजना माहे फेब्रुवारी, २०१९ पासून सुरु केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षाखालील अपत्ये ) रु. २०००/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रू. ६०००/- त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहे.
मा. पंतप्रधान महोदयांच्या संकल्पनेतून साकारलेल्या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ ही योजना अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्नवाढीसाठी राज्यात सन २०२३-२४ पासून राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये पी. एम. किसान योजनेच्या प्रतिवर्ष, प्रतिशेतकरी ६ हजार रुपयाच्या लाभामध्ये महाराष्ट्र शासन आणखी ६ हजार रुपयांची भर घालत आहे. त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना एकंदरीत १२ हजार रुपये प्रतिवर्षी लाभ अदा करण्यात येत आहे. मा. पंतप्रधान महोदयांच्या शुभहस्ते दिनांक २६ ऑक्टोबर, २०२३ रोजी शिर्डी येथून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता अदा करण्यात आलेला आहे. आज अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत एकूण ५ हप्ते वितरीत करण्यात आलेले असून
राज्यातील ९०.८६ लाख शेतकरी कुटुंबांना रू. ८९६१.३१ कोटीचा लाभ आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात थेट जमा करण्यात आलेला आहे.
मा. पंतप्रधान महोदयांच्या शुभहस्ते माहे डिसेंबर, २०२४ ते माहे मार्च, २०२५ या कालावधीतील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता वितरीत करण्यात आला आहे. या हप्ता वितरण सोहळयामध्ये महाराष्ट्र राज्यातील एकूण ९२.८९ लाख शेतकरी कुटुंबाना रक्कम रू. १९६७.१२ कोटी निधीचा लाभ वितरीत करण्यात आलेला आहे. या व्यतिरीक्त त्यानंतरही केंद्र शासनाने पी. एम. किसान योजनेअंतर्गत एकूण ६५,०४७ लाभार्थींना लाभ अदायगीचे नियोजन केले आहे. त्यानुसार राज्यातील ९३.२६ लाख शेतकरी कुटुंबाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहाव्या हप्त्याचा सुमारे रक्कम रू. २१६९ कोटी लाभ आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.
Discover more from Vande Bharat Live Tv News
Subscribe to get the latest posts sent to your email.