
प्रेस नोट
नियोजन भवन, नागपूर
नागपूर जिल्ह्यातील जलसंपदा विभागांतर्गत प्रकल्पबाधित गावांचे पुनर्वसन तसेच मंजूर, प्रलंबित आणि सुरू असलेल्या कामांसंदर्भात नियोजन भवन, नागपूर येथे आढावा बैठक घेतली. या बैठकीत गोसीखुर्द प्रकल्पाच्या बॅक वॉटर मुळे बाधित झालेल्या गावांचे तातडीने पुनर्वसन करून त्यांना सानुग्रह अनुदान देण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना निर्देश दिले. मोखाबर्डी प्रकल्प, पेंच प्रकल्प, खिंडसी पूरक कालवा, कोच्छी बॅरेज, ढालगाव खैरी तलाव, कन्हान बॅरेज, चीचघर उपसा सिंचन प्रकल्प, कार नदी प्रकल्प,लखमापूर प्रकल्प आणि सालई मोकासा प्रकल्पांचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या.
माझ्यासमवेत यावेळी, आ. आशिष देशमुख, आ. चरणसिंग ठाकूर, जिल्हाधिकारी विपीन इटनकर, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेश सोनटक्के, गोसिखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता जयंत गवळी, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता रवी पराते तसेच जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
Vande bharat live tv news,nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015