A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरे

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत लाभार्थ्यांचे अनुदान निधीअभावी थांबले… अहिल्यानगर : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत मंजूर झालेल्या शौचालय अनुदानाच्या रकमेसाठी जिल्ह्यातील अनेक लाभार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. अर्ज प्राप्त होऊन Geotagging पूर्ण झाल्यानंतरही लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा झालेले नाही. अर्ज क्रमांक 2251114472 सह अनेक अर्जदारांचे प्रकरणे सध्या प्रलंबित असून, त्यांना प्रशासनाकडून “निधी उपलब्ध नाही” असे उत्तर मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्य लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्वच्छ भारत मिशन ही केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असूनही, जिल्ह्यातील निधीअभावी लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे वेळेत मिळत नाहीत, ही बाब गंभीर आहे. शासनाने तातडीने याची दखल घेऊन आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भारतीय सुधारणा व सार्वजनिक तक्रार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष रविकुमार प्रदीप शिंदे यांनी केली आहे.

प्रतिनिधी राविराज शिंदे भारतीय पत्रकार अधिकार परिषद महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव

अहिल्यानगर :
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत मंजूर झालेल्या शौचालय अनुदानाच्या रकमेसाठी जिल्ह्यातील अनेक लाभार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. अर्ज प्राप्त होऊन Geotagging पूर्ण झाल्यानंतरही लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा झालेले नाही.

अर्ज क्रमांक 2251114472 सह अनेक अर्जदारांचे प्रकरणे सध्या प्रलंबित असून, त्यांना प्रशासनाकडून “निधी उपलब्ध नाही” असे उत्तर मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्य लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

स्वच्छ भारत मिशन ही केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असूनही, जिल्ह्यातील निधीअभावी लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे वेळेत मिळत नाहीत, ही बाब गंभीर आहे. शासनाने तातडीने याची दखल घेऊन आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भारतीय सुधारणा व सार्वजनिक तक्रार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष रविकुमार प्रदीप शिंदे यांनी केली आहे.

Back to top button
error: Content is protected !!