A2Z सभी खबर सभी जिले कीखेलगुजरातझारखंडमहाराष्ट्र

पँथर्स स्पोर्ट्स अकॅडमीचा मल्लाची महाराष्ट्र केसरी साठी निवड

करणार चंद्रपूर जिल्हाचे प्रतिनिधीत्व

 

 

:- दिनांक 26 ते 30 मार्च 2025 या कालावधीत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे मान्यतेने अहिल्यानगरी जिल्ह्यातील कर्जत तालुका या ठिकाणी 66 वी महाराष्ट्र केसरी किताबी लढत होणार आहे त्यासाठी महाराष्ट्राचे सर्व जिल्हे आप आपल्या पैलवानाची निवड केली आहे तरी चंद्रपूर जिल्हा कुस्तीगीर संघ यांची निवड चाचणीत स्थानिक पँथर्स स्पोर्ट अकॅडमी येथील पैलवान शहाबाज मेहबूब खान याची गादी विभागात 65 किलो मध्ये निवड करण्यात आली तरी हा व पँथर्स स्पोर्ट अकॅडमी येथील बाकी मल्ल बरेचदा आपल्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केलेले आहे. तरी या निवड प्रक्रियेमध्ये निवड करिता चंद्रपूर जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष श्री शरद टेकुलवार, सचिव श्री छगन पडगेलवार, श्री.मुरली टेकुलवार श्री. राजेश सोलापन तसेच बाकी पदाधिकारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे शहाबाज मेहबूब खान यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे पँथर्स स्पोर्ट अकॅडमीचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक श्री मुकेश पांडेय (NIS कोच) तसेच सचिव श्री उमेश पंधरे तसेच बाकी पदाधिकारी यांनी अभिनंदन केला तसेच अहिल्यानगरी कर्जत येथे होणारा महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी पैलवानांना खूप खूप शुभेच्छा दिल्या.

Back to top button
error: Content is protected !!