
संजय पारधी चंद्रपूर
घुग्घूस – : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय ग्रॅपलिंग स्पर्धेत शारोन पब्लिक स्कुल घुग्घूसच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करून संपूर्ण जिल्ह्यात शाळेचे नाव चमकविले आहेत.
या स्पर्धेत कु.विग्नेश महेश सुदाती यांनी 54 किलो वयोगटात तर चरण राजेश लकाकुल्ला यांनी 58 किलो वयोगटात विजयी होऊन प्रथम स्थान प्राप्त केले आहे. या विद्यार्थ्यांची आता नागपूर विभागीय स्तरावर निवड झालेली आहे. या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या शाळेतील मुख्यध्यापक मेरी ग्रेस मॅडम व शाळेचे व्यवस्थापक स्टिफन सुंदीला, शिक्षक तथा आपल्या आई वडिलांना दिले आहेत.
संपूर्ण घुग्घूस शहरातून या मुलावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.






