ताज़ा खबर

टीव्हीएस कंपनीचे बनावट स्पेअर पार्ट विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल

टीव्हीएस कंपनीचे बनावट स्पेअर पार्ट विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल भोसरी पुणे

पिंपरी- टीव्हीएस कंपनीचे बनावट स्पेअर पार्ट विक्री केल्याप्रकरणी भोसरी परिसरातील दोन दुकानदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.२) सायंकाळी करण्यात आली. जयेश उकमलजी जैन (३४, रा. दिघीरोड, भोसरी), मनोज खिमजी पलान (५६, रा. भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या दुकानदारांची नावे आहेत.
याप्रकरणी टीव्हीएस कंपनीचे डिव्हिजन ऑफिसर पीयूष राऊत यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुणे- नाशिक महामार्गावर खंडोबा माळ चौक- भोसरी येथे जय गोगा ऑटोमोबाईल आणि पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी उड्डाण पुलाजवळ मनोज ऑटो पार्ट या दुकानांमधून टीव्हीएस कंपनीचे बनावट पार्ट विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, कंपनीचे डिव्हिजन ऑफिसर राऊत यांनी खातरजमा करून पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी ५१ हजार ८११ रुपये किमतीचे बनावट पार्ट जप्त केले आहेत

[yop_poll id="10"]
Show More
Back to top button
error: Content is protected !!