A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेताज़ा खबरमहाराष्ट्र

कॉन्व्हेंट शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन देण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश.

WhatsApp Image 2024 08 06 at 12.37.27 2

संजय पारधी चंद्रपूर,महाराष्ट्र

चंद्रपूर : अनेक वर्षापासून राज्यातील कॉन्व्हेंट शाळेतील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी न्याय मागण्यासाठी आंदोलन व शासनाला निवेदन देत असून तरी त्यांना शालेय नियमानुसार पूर्णवेतन देण्यात येत नाही. याच बाबीचा आधार घेत नांदेड येथील ज्ञानमाता विद्यालयच्या शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात पूर्ण वेतन व सुविधा मिळण्याबाबत याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या अंतिम निकालात माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने रंजना जोशी व इतर विरुद्ध ज्ञानमाता विद्यालय नांदेड तथा राज्य शासनाला दिनांक 21/ 3/ 2017 च्या केस नंबर 3522/2016 निकालात सातव्या वेतन आयोगा नुसार वेतन देण्याचे निर्देश दिले आहे. तसेच शेड्युल सी मध्ये दुरुस्ती करून ते लवकरात लवकर लागू करण्याचे निर्देशही शासनाला दिले आहे. त्यानुसार शासनाने शेड्युल सी मध्ये दुरुस्ती केली असून त्याच्यानुसार ज्ञानमाता विद्यालय नांदेड येथील शिक्षक कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन दिल्या जात आहे. माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांच्या निकालाचा राज्य शासनाच्या शालेय विभागाने पालन करून राज्यातील सर्व कॉन्व्हेंट शाळेतील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना माननीय न्यायालयाने निर्देशित केल्या नुसार व सातव्या वेतन आयोगानुसार वेतन दिला जात आहे की त् नाही याची तपासणी करून दोषी संस्था चालकार गुन्हे दाखल करावे, अन्यथा याची सर्वस्वी जबाबदारी राज्य शासनाच्या शालेय विभागाची समजून न्यायालयाचा निकालाचा अवमान प्रकरणी दोषी ठरविण्यात येईल व संबंधित विभागावर रीतसर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

[yop_poll id="10"]
Show More
Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!