
संजय पारधी बल्लारपूर
बल्लारपूर : दिनांक 25/09/2024 बुधवार ला जिल्हास्तरीय आंतरशालेय टेनीकॉइड स्पर्धेचे आयोजन केले होते. यात विविध शाळेतील विद्यार्थयांनी सहभाग घेतला होता. त्यामधून सेंट पॉल स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांमधुन कृष्णा तुमाने, आयुष उंदीरवाडे, आयुष भडके, आदर्श ठाकरे, नयन बोधे. त्याचप्रमाणे मुलींमधुन गुंजन कोकाटे, नेहाली उद्रेके, श्रद्धा बोराडे, संस्कृती निमगडे, समृद्धी सावले इत्यादी विद्यार्थ्यानी तृतीय क्रमांक पटावले त्यामधुन आयुष उंदीरवाडे, कृष्णा तुमाने, नेहाली उद्रेके यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने. शाळेचे संस्थापक अविनाश खैरे, संचालिका निना, खैरे शाळेच्या मुख्याध्यापिका मेनका भंडूला यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आणि उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. क्रीडा शिक्षक मनोज डे सर व प्रमोद वासेकर सर यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.










