
राहुल खेवलकर(जळगांव)- तुमच्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वाचा पाऊल उचलू या.. हेल्मेट घालून तुमचं जीवन वाचवता येऊ शकतं. आपल्या आणि आपल्या प्रियजनांच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट घालणं खूप महत्त्वाचा आहे. जर आपण हेल्मेट घालून गाडी चालवली तर आपलं आणि आपल्या प्रियजनांचे जीवन अधिक सुरक्षित होईल. जळगाव शहरात दिनांक 17 जानेवारी सकाळी नऊ वाजता हेल्मेट जनजागृती साठी मोटरसायकल रॅली आयोजित करण्यात आलेली आहे पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत दिनांक 17 जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता हेल्मेट जनजागृतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या मोटरसायकल रॅली साठी अवश्य सहभाग नोंदवावा असे आवाहन जळगाव शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक माननीय राहुल गायकवाड यांनी समस्त जळगाव शहरवासी यांना केलेले आहे. आपल्या सहभागाने आपण आपल्या आणि आपल्या प्रियजनांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचं पाऊल उचलू शकतात.रॅली ची सुरुवात व्हॉलीबॉल ग्राउंड ,पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव, कोर्ट चौक, टॉवर चौक, नेरी नाका , अजिंठा चौक , आकाशवाणी चौक, पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत असेल. हेल्मेट घालण्याचे महत्त्व फक्त आपल्यासाठी नसून आपल्या मित्र परिवारासाठी सुद्धा आहे.रॅलीमध्ये सहभागी होऊन आपण आपल्या कुटुंबासाठी आणि मित्रपरिवारासाठी एक उत्तम उदाहरण देऊ शकतो. चला सुरक्षिततेचे महत्त्व पटू या हेल्मेट घाला सुरक्षित रहा 17 जानेवारीला जळगाव शहरातील रॅलीत सहभागी होऊन सुरक्षितता सुनिश्चित करा.