सावनेर : सावनेर शहरांमध्ये विविध भागात रस्त्यावर वाढलेले अतिक्रमण लक्षात घेता नगरपालिकेने वाहतूक पोलिसांच्या मदतीने अतिक्रमण हटवा मोहीम सुरू केली आहे. मुख्याधिकारी किरण बगडे नगरपरिषद सावनेर यांनी विशेष लक्ष घालून पोलीस विभागाच्या मदतीने अतिक्रमण व रहदारीस होणारे अडथळे दूर करण्यासाठी विशेष पथक नेमून कारवाई सुरू केली आहे. शहरातील मेन लाईन बस स्टॅन्ड आठवडी बाजार पोलीस स्टेशन रोड तहसील विभाग समोर अशा विविध भागात पथका समवेत स्वतः फिरून प्रथम सर्व अतिक्रमण धारकांना सूचना देण्यात आल्या त्यानंतर अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू केली.
यावेळी वाहतूक शाखेचे सहायक पोलीस सुभाष रुधे,बंडू कोकाटे, सुभाष मेश्राम व अन्य कर्मचारी शहर अभियंता व स्वच्छ ता निरीक्षक पंकज छेनीया,धीरज देशमुख,संजय वाघमारे, विजय वाल्मिकी इत्यादी कर्मचारी होते.
सावनेर प्रतिनिधी, सुर्यकांत तळखंडे. 9881477824