
जत शहरात गेली पंधरा दिवस सगळीकडे घाणीचे साम्राज्य होताना दिसत आहे. जत अथणी रोडवर रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग साचले आहे त्यामुळे त्या परिसरात डासांचे प्रमाण खूप वाढले आहे.
तसेच जत शहराच्या मध्यभागी असलेले गंधर्व चौकात सुद्धा कचऱ्याचे ढीग साचून आहे आणि मोकाट जनावरे येथे तळ ठोकून असतात आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना त्रास सहन करावा लागतो याचा नगरपरिषदेला काही फरक पडत नाही.