A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेमहाराष्ट्रसंगमनेर

संगमनेर शेहरात शिव जयंती जोरात साजरी

शिवजयंती धामधूम ने साजरी

संगमनेर शेहरात, शिव जयंती धूम-धाम

छत्रपती प्रतिष्ठान आणि एकविरा फाउंडेशन च्या वतीने आज शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. जाणता राजा मैदानातून निघालेल्या बाईक रॅलीने छत्रपती शिवरायांना अनोखी मानवंदना दिली. संबळ, तुतारी आणि ढोल ताशाचा गजर करत रयतेच्या राजाला अभिवादन केले.

मालपाणी लॉन्स येथे शिवजन्माचा उत्सव साजरा करण्यात आला. शिवव्याख्याते गणेश शिंदे यांचे सुश्राव्य व्याख्यान यावेळी पार पडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचे अनेक पैलू यावेळी त्यांनी उलगडून दाखविले.

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या सोहळ्यात हजारो तरुण-तरुणींनी सहभाग नोंदविला. नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली.

एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात, छत्रपती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सचिन आहेर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नातून ही वैचारिक शिवजयंती साजरी करण्यात आली. विविध नाटकांमधून शिवरायांची भूमिका साकारणाऱ्या डॉ. सागर फापाळे यांचीही उपस्थिती यावेळी लाभली.

#छत्रपतीशिवाजीमहाराज #शिवजयंती #शिवचरित्र #संगमनेर #मोटरसायकलरॅली #शिवभक्त #शिवप्रेमी #छत्रपतीप्रतिष्ठान #एकविराफाउंडेशन

Back to top button
error: Content is protected !!