
शिवाजीनगर मंगला टॉकीज येथे अगस्त 2023 मद्धे मर्डर झाला होता. या गुन्ह्यामध्ये एकुण 22 आरोपी होते, त्यापैकी 20 आरोपींना अटक करून मोक्का (महाराष्ट्र संघटीत गुहेगारी) अंतर्गत कारवाई करण्यात आली. सदर खुणाचा तपास विश्रामबाग ए.सी.पी ठोंबरे यांच्याकडे आहे. त्यानी गुन्ह्यातील एक फरारी आरोपी याला अटक करण्यासाठी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला वारंवार सूचना दिल्या होत्या त्यानुसार त्यांनी शिवाजी नगर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलिस निरिक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शना खाली क्राईम पोलिस निरिक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या टिमने कारवाई करत आरोपी पंडीत ऊर्फ पिंटू ऊर्फ भाऊ दशरथ कांबळे (वय 20 वर्ष, निवास- खड्डा झोपडपटटी,13 ताडीवाला रोड) यास अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हे कामी दि. 11 मार्च 2025 रोजी शिवाजीनगर पो.स्टे. हद्दीमध्ये पी.एस.आय अजित बडे हे तपास पथकासह पेट्रोलिंग करीत असताना पो.ना सचिन जाधव यांना त्यांच्या गुप्त बात्मीदारामार्फत बातमी मिळाली की, 19 महिन्यांपासून फरारी असलेला खुनातील आरोपी दांडेकर पूल दत्तवाडी येथे आला आहे. त्यानुसार त्यांनी सापळा रचून आरोपीस अटक केली. आरोपीकडून 02 पिस्तूल व 04 जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहेत. नमुद आरोपी हा अट्टल गुन्हेगार असुन त्याच्यावर यापूर्वी अजुन 02 खुनाचे व इतर 04 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यातील येरवडा पोलीस स्टेशन येथील मुंडी मर्डर अत्यंत गाजलेला व अतिशय क्रूर प्रकारे केलेला खून प्रकरण आहे. सदर टोळ्या या पंडित टोळी व यल्ला टोळी नावाने ताडीवाला रोड येथे प्रसिद्ध आहेत.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शना खाली पोहवा रुपेश वाघमारे, भाऊ चव्हाण, प्रमोद मोहिते, राजकिरण पवार, महावीर वलटे, अतुल साठे, पोना. सचिन जाधव, पोशि. प्रविण दडस, सुदाम तायडे, श्र