A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

घोडाझरी तलावात पाच जणांचा बुडून मृत्यू

पिकनिक बेतली जिवावर, नागभिड येतील घटना

GridArt 20250316 025252489

वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज राजुरा

 

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात असलेल्या घोडाझरी पर्यटनासाठी गेलेले पाच युवक तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी, १५ मार्च रोजी चार वाजताच्या सुमारास घडली. घटनास्थळी नागभीड पोलीस दाखल झाल्यावर त्यांनी शोधमोहीम राबवित पाचही युवकांचे मृतदेह बाहेर काढले.

सदर युवक हे चिमूर तालुक्यातील साटगाव कोलारी येथील आहेत. जनक किशोर गावंडे, यश किशोर गावंडे, अनिकेत यशवंत गावंडे, तेजस बालाजी गावंडे व तेजस संजय ठाकरे अशी तलावात बुडालेल्या युवकांची नावे आहेत. यापैकी दोन सख्खे भाऊ असून दोन चुलत भाऊ आहेत. हे चार जण गावंडे कुटुंबातील आहेत. तर एका मित्राचा समावेश आहे.

आज शनिवारी चिमूर तालुक्यातील साटगाव कोलारी येथील जनक किशोर गावंडे, यश किशोर गावंडे, अनिकेत यशवंत गावंडे, तेजस बालाजी गावंडे, तेजस संजय ठाकरे व आर्यन हेमराज हिंगोली हे सहा मुले पर्यटनासाठी आली होती. दुपारपासून त्यांनी घोडाझरी तलावावरील पर्यटनाचा आनंद घेतला.त्यानंतर त्यांना पोहावयाचे राहवले नाही. त्यामुळे सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास सहा मुले पोहण्याकरिता तलावात उतरली. पाण्याची पातळी खोल गेल्याने आणि या परिसरात डोह असल्यामुळे सहाही जण डोहामध्ये बुडाले. त्यापैकी आर्यन हेमराज हिंगोली मुलगा कसाबसा वाचला तर उर्वरित जनक किशोर गावंडे, यश किशोर गावंडे, अनिकेत यशवंत गावंडे, तेजस बालाजी गावंडे, तेजस संजय ठाकरे हे पाचही मुले तलावात बुडाली.

सर्व मुले १८ ते २२ वर्षे वयोगटातील आहेत. तलावातून वाचून बाहेर आलेल्या मुलाने सदर घटना घटनास्थळी असलेल्या नागरिकांना सांगितली. त्यानंतर तत्काळ नागभीड पोलिसांना माहिती देण्यात आली. अवघ्या काही वेळातच नागभीड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पाचही मुले तलावातच बुडालेले आहेत. सदर घटनेची माहिती मुलांच्या कुटुंबीयांना साटगाव कोलारी येथे देण्यात आलेली आहे. पोलिसांनी घटनास्थळी प्राथमिक चौकशी सुरू करीत तात्काळ शोधमोहीम राबवित बुडालेल्या युवकांचे मृतदेह बाहेर काढले.

[yop_poll id="10"]
Show More
Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!