
नागपूर: प्रतिनिधी राविराज शिंदे
मनरेगा मजूर हे दीर्घकालीन व स्थीर उपजीविकेसाठी सक्षम व्हावीत, या उद्देशाने मनरेगा मजुरांना आता रोजगारासोबतच नवीन कौशल्य विकासाचे प्रशिक्षणही उपलब्ध होणार आहे. रोहयो सचिव गणेश पाटील यांनी यासंदर्भातील सूचना अधिकाऱ्यांना केल्या.
रोहयो सचिव गणेश पाटील मनरेगाचा आढावा घताना. सोबतच आयुक्त डॉ. भरत बास्टेवाड व इतर.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची (मनरेगा) आढावा बैठक रोहयो सचिव गणेश पाटील अध्यक्षतेखाली मनरेगा, आयुक्तालयात पार यांच्या रविवारी पडली. यावेळी मनरेगाच्या अंमलबजावणीतील विविध बाबींचा सखोल विकसित आढावा घेण्यात आला. त्यावेळी त्यांनी उपरोक्त सूचना केली. बैठकीस रोहयो आयुक्त डॉ. भरत बास्टेवाड, उपायुक्त (कृषी) सुबोध मोहरील, सहायक आयुक्त सुश्मिता शिंदे उपस्थित होते. मजूर हा रोहयो योजनेचा
एक महत्त्वपूर्ण घटक असून जे मजूर वर्षानुवर्षे मनरेगा योजनेत काम करत
आहेत त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना तयार करण्याचे शासनाच्या विचाराधीन असल्याचेही गणेश पाटील यांनी यावेळी तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली करा सांगितले, नवीन कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणामुळे मजुरांचे आर्थिक सक्षमीकरण साधता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यासोबतच संत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून मनरेगा योजनेच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यावर त्यांनी भर दिला. मनरेगाच्या कामांमध्ये पारदर्शकता व गती यावी, यासाठी
तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एक मजबूत संनियंत्रण प्रणाली विकसित करण्यात यावी, असे त्यांनी यावेळी सांगितले. मजुरांना वेळेवर काम व वेळेवर वेतन मिळावे
मजुरांना वेळेवर काम व वेतन मिळावे यासाठी यंत्रणेत कोणते बदल आवश्यक आहेत, याचा अभ्यास करून उपाययोजना राबवाव्यात, अशी सूचनाही रोहयो सचित गणेश पाटील यांनी अधिकाऱ्यांना केली. मनरेगाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना रोजगार मिळावा व विकासकामे प्रभावीपणे पूर्ण व्हावीत, या दृष्टीने सर्वांनी मिळून काम करण्याचे निर्देश ही सचिवांनी सर्वांना दिले.