थाणेमहाराष्ट्र

कल्याण : डिप क्लिनिंग मोहिमेची केडीएमसी आयुक्तांनी केली पाहणी

कल्याण – कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या डिप क्लिनिंग मोहिमेच्या कामाची महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी केली. कल्याण शिळ रस्ता, काटई नाका ते दुर्गाडी पुलापर्यंत रस्त्याची पाहणी केली.

कल्याण काटई नाका येथील ट्रॅफिक नियंत्रण अनुषंगाने चौकाचे विस्तारीकरण तसेच चौकाचे नियोजन करुन या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसविणेबाबत संबंधित अधिका-यांना आयुक्तांनी आदेश दिले. काटई नाका ते पत्रीपुल या मार्गावर दुतर्फा करण्यात आलेले खोदकाम आणि पदपथावरील यावरील डेब्रिज उचलणे बाबत संबंधित प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना सुचना देण्यात आल्या. पत्रीपुल ते दुर्गाडी किल्ला गोविंदवाडी बायपास रस्त्यामधील पुलाचे गर्डर तसेच लेबर शेड हटविणेबाबत एमएसआरडीसी विभागास आदेश दिले. गोविंदवाडी बायपास रस्त्यावरील कचरा आणि डेब्रिज उचलण्या यावे अशी सूचना या परिसारतील म्हसीच्या तबेलेधारकानाही दिल्या आहेत. गोविंदवाडी-दुर्गाडी चौकात होणा-या ट्रॅफीक नियोजन अनुषंगाने भटाळे तलाव येथील विकास योजनेतील रस्त्यातील अतिक्रमणे हटविणेबाबत संयुक्त मोहीम हाती यावी असी सूचना महापालिका आयुक्त जाखड़ यांनी अधिका-यांना दिल्या आहेत.

Vande Bharat Live Tv News
Back to top button
error: Content is protected !!