A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेताज़ा खबरदेशमहाराष्ट्रलाइफस्टाइल

सरकारच्या योजनांतून गावात विकास व्हावा

माजी नगरसेवक संगमनेरे : एकलहरा गावात विकासकामांचे भूमिपूजन

नाशिकरोड : प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर :  लोकनियुक्त सरपंच यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना गावात राबवून एकलहरा गाव विकसित करावे. सर्व सदस्य ग्रामस्थ यांना विश्वासात घेऊन गावात विकासाची गंगा आणावी, असे प्रतिपादन माजी नगरसेवक तथा मा. नाशिकरोड प्रभाग सभापती विशाल संगमनेरे यांनी केले.

      एकलहरागाव येथे दलित सुधार निधी व वित्त आयोग निधी अंतर्गत विविध विकासकामांचे भूमिपूजन मनपाचे माजी प्रभाग सभापती, माजी नगरसेवक विशाल संगमनेरे व एकलहरा गावचे सरपंच अरुण दुशिंग यांच्या हस्ते संपन्न झाले. एकलहरे गाव राजवाडा येथे भूमिगत गटारीचे व सिद्धार्थनगर, आंबेडकरनगर, साठेनगर, रोहिदासनगर, गौतमनगरमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास करणे योजनेंतर्गत व १५ वित्त आयोग निधी अंतर्गत भूमिगत गटारी करणे, रस्ता काँक्रिटीकरण करणे, गावांतर्गत साफसफाई करणे, एकलहरेगाव राजवाडा येथे सुसज्ज सार्वजनिक शौचालय बांधकाम करणे, जय बाबाजीनगर एकलहरेगाव येथे रस्ता सुधारणा करणे, सिद्धार्थनगर येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे, हनुमाननगर येथील विहिरीचे पुनर्जीवन करून विहिरीला सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षकभिं त बांधकाम व इतर दुरुस्तीचे कामे अशा एकूण ८० लक्ष रुपयांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

       याप्रसंगी लोकनियुक्त सरपंच अरुण दुशिंग यांनी सांगितले की, लवकरच भूमिपूजन झालेली कामे गतीने पूर्णत्वास नेले जाईल व येत्या पुढील काळात एकलहरे परिसरात मोठ्या प्रमाणात अशीच विकासगंगा सुरू राहील. ग्रामविकास अधिकारी शरद पाटील व उपसरपंच दिलीप राजोळे, ग्रामपंचायत सदस्य सागर जाधव, मधुकर कापसे, सचिन होलिन, नीलेश धनवटे, सुवर्णा धनवटे, मधुकर महाले, सुजाता पगारे, सविता पगारे, सविता पवळे, श्रीराम नागरे, राणी शिंगुमारे, शोभा म्हस्के, संजय ताजनपुरे, सुशीला घुगे, निर्मला जावळे आदी उपस्थित होते. ग्रामस्थ राजू जाधव, भाऊसाहेब जगताप, सचिन चौधरी, सुभाष संगमनेरे, सुभाष खैरनार, वैभव खर्जुल, दादा चिडे, प्रशांत भालेराव, सोपान दुशिंग, सुनील पवळे, राजू भवर, विश्वनाथ होलीन, भाऊसाहेब जगताप, भारती मोरे. शालिनी आहिरे, रमेश चव्हाण, दीपक बोरसे, संगम देवरे, राहुल साठे, तेजस गायकवाड, आकाश डोळस, संगम बोराळे, निलेश सोनवणे, उपस्थित होते. त्याप्रसंगी एकलहरे परिसरात विविध विकासकामांचे भूमिपूजन झाल्याने ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!