A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेताज़ा खबर
Trending

संत्रा प्राथमिक प्रक्रिया केंद्र उभारणीसाठी प्रस्ताव आमंत्रित.

संत्रा प्राथमिक प्रक्रिया केंद्र उभारणीसाठी प्रस्ताव आमंत्रित.

प्रेस नोट
नागपूर प्रतिनिधि

संत्रा प्राथमिक प्रक्रिया केंद्र उभारणीसाठी प्रस्ताव आमंत्रित.

आधुनिक संत्रा प्रक्रिया उभारणी योजने अंतर्गत प्राथमिक प्रक्रिया केंद्र उभाण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहे. प्रस्तवाकरिता निविदा तसेच मॉडेल प्रकल्प अहवाल महाराष्ट्र राज्य कृषिपणन मंडळाच्या www.msamb.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला असून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १ सप्टेंबर अशी आहे.
राज्य शासनाने राज्यातील नागपूर, काटोल व कळमेश्वर जि.नागपूर, मोर्शी तालुका जि.अमरावती व संग्रामपूर जि. बुलढाणा येथे आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र उभारणे या योजनेस शासन निर्णयान्वये मान्यता देऊन २० कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. योजनेच्या अंमलबजावणीकरीता महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ,पुणे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. योजनेच्या लाभार्थीमध्ये सहकारी प्रक्रिया संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, खाजगी उद्योजक आणी बाजार समिती यांचा समावेश आहे. प्राथमिक प्रक्रिया प्रकल्पात पॅक हाऊस, संत्रा ग्रेडिंग लाईन,प्रिकुलिंग, कोल्ड स्टोरेज इत्यादी सुविधांचा समावेश असून अंदाजित खर्च ४ कोटी रुपये अपेक्षित आहे.या योजेतंर्गत या प्रकल्पाकरिता प्रथमतः लाभार्थ्यांनी १५ टक्के स्वनिधी व उर्वरित ८५ टक्के निधी बँकेकडून कर्ज स्वरूपात उपलब्ध करून प्रकल्प उभारणी पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रकल्प पूर्णत्वाचा दाखला प्राप्त झाल्यानंतर शासनाकडून प्रकल्पाच्या अंदाजित किमतीच्या ५० टक्के मर्यादेपर्यंतचे किंवा कमाल रक्कम २ कोटी अनुदान देण्यात येणार असून हे अनुदान लाभार्थीच्या कर्ज खाती जमा करण्यात येईल.
या योजनेचा लाभ संबंधीत तालुक्यातील जास्तीत जास्त लाभार्थीनी घ्यावा व या योजनेच्या अधिक माहितीकरिता महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, विभागीय कार्यालय नागपूर (०७१२-२७२२९९७) व (९४२२१४२९५९) या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ विभागीय उपसरव्यवस्थापक अजय कडू यांनी केले आहे.

वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज नागपूर
रिपोर्टर देवाशिष टोकेकर

[yop_poll id="10"]
Show More
Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!