A2Z सभी खबर सभी जिले कीमुंबई
Trending

◆ *उरणची ‌‘यशस्वी‌’ लव्ह जिहादची शिकार?* *नातेवाईकांचा आरोप* ◆ नराधम दाऊदच्या कृत्याने महाराष्ट्र हादरला ◆ निर्घृण हत्या करुन मृतदेहाची विटंबना ◆ संशयित आरोपी दाऊद शेख अद्याप फरार ◆ उरणकरांचा पोलीस ठाण्यावर जनआक्रोश मोर्चा

◆ *उरणची ‌‘यशस्वी‌’ लव्ह जिहादची शिकार?* *नातेवाईकांचा आरोप* ◆ नराधम दाऊदच्या कृत्याने महाराष्ट्र हादरला ◆ निर्घृण हत्या करुन मृतदेहाची विटंबना ◆ संशयित आरोपी दाऊद शेख अद्याप फरार ◆ उरणकरांचा पोलीस ठाण्यावर जनआक्रोश मोर्चा

प्रेस वार्ता
नागपूर प्रतिनिधि

◆ *उरणची ‌‘यशस्वी‌’ लव्ह जिहादची शिकार?*
*नातेवाईकांचा आरोप*
◆ नराधम दाऊदच्या कृत्याने महाराष्ट्र हादरला

◆ निर्घृण हत्या करुन मृतदेहाची विटंबना
◆ संशयित आरोपी दाऊद शेख अद्याप फरार
◆ उरणकरांचा पोलीस ठाण्यावर जनआक्रोश मोर्चा
——–
विशेष प्रतिनिधी, उरण
दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या उरणच्या यशस्वी शिंदे (नाव बदलेले) (वय 22) या तरुणीचा मृतदेह शनिवार, दि. 27 जुलै रोजी उरणच्या कोर्टनाका परिसरात गरिकांचे पेट्रोलपंपाजवळ आढळून आला. ‌‘यशस्वी‌’ लव्ह जिहाद ला बळी पडली असून, तिच्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी संतप्त प्रतिक्रिया उरण परिसरातून उमटत आहे. दाऊद शेख नामक व्यक्तीने यशस्वी शिंदे ची हत्या केलाचा संशय तिच्या वडिलांनी व्यक्त केला आहे. संशयित आरोपी बंगळुरू येथील असल्याचे सांगितले जात होते. पोलिसांनी आरोपीला महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरून अटक केली आहे.
उरण शहरात एन.आय. स्कूलजवळ राहणारी यशस्वी दि.25 जुलै रोजी सकाळी घराबाहेर पडली. परंतु, ती घरी परतलीच नाही. त्यामुळे ती बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या नातेवाइकांनी उरण पोलीस ठाण्यात नोंदविली होती. तिचा मृतदेह शनिवारी पहाटे कोर्टनाका परिसरात पेट्रोलपंपाजवळ छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला. उरण पोलिसांनी तिचा मृतदेह इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. पोलिसांनीही संशयित आरोपी दाऊद शेख याचा शोध सुरू केला असून तो बंगळुरू येथे गेल्याचे समजले होते. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी दरम्यान केले होते.
कुटुंबीयांनी मृतदेहाची ओळख पटविल्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. यानंतर माध्यमांशी बोलत असताना यशस्वी शिंदेच्या वडिलांनी दाऊद शेख नामक इसमावर हत्या केल्याचा आरोप केला. एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाली असावी, असा पोलिसांनाही संशय आहे.

वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज नागपुर
सम्पादक
पोलिस मित्र महासंघ नागपूर शहर अध्यक्षपद देवाशिष टोकेकर

Back to top button
error: Content is protected !!