
प्रेस वार्ता
नागपूर प्रतिनिधि
1/11/2005 पूर्वीचे अनुकंपा धारकास जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या बाबतचे निवेदन तसेच मा.देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री यांचासंघटनेचे वतीने अभिनंदन
आज दिनांक 2/8/2024 लाभ सायंकाळी 6.30 वाजता महाराष्ट्र चे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्र राज्य यांचे देवगिरी शासकीय निवासस्थानी नानाभाऊ महल्ले जिल्हाध्यक्ष राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र जिल्हा शाखा नागपूर यांचे अध्यक्षतेखाली वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प योजना लागू केल्याबाबत विदर्भातील 6 जिल्ह्यातील पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मोठा होता.या प्रकल्पामुळे विदर्भातील शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रमाण होते.हे प्रमाण कमी व्हावे या हेतूने आपण पुढाकार घेऊन अनेक दिवसांपासून वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प योजना महाराष्ट्र शासनाकडे प्रलंबित होती.विदभौतील सिंचन शेतकरी, नागरीक हित लक्षात होऊन नदीजोड प्रकल्प योजना मंजूर करून आपण विदर्भातील शेतकरी व नागरीकांना न्याय मिळून दिल्याबाबत संघटनेचे वतीने आपले विशेष अभिनंदन
आपले सदैव अश्यातच प्रकारे सकारात्मक विदर्भाचा प्रगतीशील विचार करुन प्रगतीशील राज्य करावे,ही विनंती यावेळी सन 2005पूवीऀ अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळाली पंरतू कागदपत्रे तपासणी करण्यासाठी प्रशासनाने विलंब केल्याने अनुकंपा तत्त्वावर लागलेल्या कर्मचारी यांना 1/11/2025 नंतर सेवेत रूजू झाले असल्याने त्या कर्मचारी यांची कोणतीही चुक नसून ही प्रशासकीय अधिकारी यांचे कडून झालेला विंलब असल्याने त्यांना शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करून न्याय द्यावा,या बाबचे निवेदन संघटनेचे वतीने देण्यात आले.या सोबत हिंगणा नगरपंचायत क्षेत्राची अंतिम विकास योजना प्रस्ताव अंतिम टप्यामध्ये मा.मुख्यमंत्री कार्यालया मध्ये प्रलंबित आहे.या आधी विहीत सर्व तांत्रिक बाबी नगरविकास विभागा माफऀत पूर्ण झालेल्या आहेत.तरी हिंगणा नगरपंचायत अंतिम विकास आराखड्याला मंजूरी देण्याची प्रक्रिया त्वरीत करण्याकरीता विदर्भ पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नागपूर संस्थेच्या वतीने निवेदन दिले यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानाभाऊ महल्ले, कोषाध्यक्ष बुधाजी सुरकार, उपाध्यक्ष सुनिल व्यवहारे,राजपात्रित अधिकारी महासंघाचे राज्य सहसचिव योगेश निंबाळकर,कुतिशील अधिकारी व कर्मचारी संस्था नागपूर जिल्ह्याचे सचिव पूरूषोत्म मिलमिले,केशव शास्त्री तसेच अनुकंपा धारक श्रीमती वनिता बनसोड, अश्विनी मानकर(घिमे ) चारूदत भावे,राजू बिसेन आरोग्य विभागाचे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र जिल्हा शाखा कार्यकारिणी सदस्य दिपक गोतमारे,शिक्षण विभाचे मनोज पांडे उपस्थित होते.
वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज नागपूर
संपादक
पोलिस मित्र महासंघ नागपूर शहर अध्यक्ष देवाशिष टोकेकर