A2Z सभी खबर सभी जिले की

पशुखाद्य कारखान्यासाठी पुढाकार घेणार – डॉ.सुजय विखे पाटील

अहमदनगर | शहाजी दिघे

InShot 20241013 234840244
वंदे भारत टीव्ही न्यूज करिता शहाजी दिघे 9420805277

पशुखाद्य कारखान्यासाठी पुढाकार घेणार…डॉ.सुजय विखे पाटील
नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने लवकर शेतकऱ्यांना दुधाच्या जोडधंद्यासाठी मदत व्हावी यासाठी पशुखाद्य कारखाना टाकण्यासाठी पुढाकार घेणार आहे.या माध्यमा तून शेतकऱ्यांना ५० टक्के सवलतीच्या दरात खाद्य उपलब्ध होईल जिरायत दुष्काळी भागाला न्याय देण्याचे काम माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केले आहे.ही त्यांची शेवटची निवडणूक असून त्यांनी आपल्यासाठी गेली २५ वर्ष त्याग,संघर्ष केला आहे.आता आपल्यावर परत फेड करायची वेळ आली आहे.आजची सभा ही पावसात झाली असून ते आता नक्कीच निवडून येणार आहेत.त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आमच्यावरही आहे.त्यांनी देखील प्रत्येक निवडणुकीत मतदारसंघ बदलून निवडून येण्याचे काम केले.ही बाब सोपी नाही, असे प्रतिपादन माजी खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले.
नगर तालुक्यातील कापूरवाडी पिंपळगाव उज्जैनी पोखर्डी ते छत्रपती संभाजीनगर महामार्गपर्यंत रस्ता मजबुतीकरण कामाचा शुभारंभ माजी खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.माजी खा.डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले,मला कधीच पदाचा मोह नव्हता.मी राजकारणातून युवा पिढीच्या उज्वल भविष्यासाठी काम करायचे स्वप्न पाहिलेले असून नगर जिल्ह्याचे चित्र बदलायचे आहे.मी मागील निवडणुकीमध्ये विकास कामाचे दिलेले शब्द पूर्ण केले.तेव्हाच दुसऱ्या निवडणुकीला जनतेसमोर मत मागायला आलो होतो.मात्र दुधाच्या अनुदानाचे सॉफ्टवेअर नवीन होते.त्यामुळे शेतकऱ्यांना अडचण झाली आता खटाखट पैसे येतात.आता कांद्याला देखील चांगला बाजार आहे.मी खचणारा माणूस नसून माझी ओळखी पदापेक्षा मोठी आहे.मी लोकांच्या मनामध्ये विकास कामाच्या माध्यमातून स्थान निर्माण केले आहे.नगर तालुक्याचे चित्र माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी विकास कामातून बदललेले आहे.गेल्या २५ वर्षात शेती,डीपी,शाळा खोल्या, वाड्यावस्त्यांपर्यंत रस्त्यांची कामे केली असल्यामुळे ते खऱ्या अर्थाने नगर तालुक्याचे शिल्पकार आहेत.मी पिंपळगाव उज्जैनी गावात विकास कामासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला.तरी देखील मला लोकसभे मध्ये ३०० मते कमी पडली.मात्र मी कधीही विकासाच्या कामात राजकारण करत नसून जनतेचे प्रश्न सोडविणे हाच माझा प्रयत्न आहे,असे सुजय विखे पाटील यांनी सांगितले.माजी मंत्री शिवाजी कर्डिले म्हणाले की,राजकारणामध्ये अपयश येत असते.आता माझी ही शेवटची निवडणूक आहे.तुम्ही मला गेली २५ वर्ष भरपूर दिले.वयाचा विचार केला पाहिजे.ही निवडणूक कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव व मागणीनुसार लढणार आहे.गावातील गटातटाचे राजकारण बाजूला ठेवून एकमेकांमधील मतभेद विसरून काम करा.माझ्या कडे कोणी आले तरी त्यांचे काम केले जाते.गेल्या ५ वर्षांमध्ये मी आमदार नसलो तरी राज्य सरकार च्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे मला आमदार असल्यासारखे वाटले.विकास कामे करण्याची चिंता तुम्ही करू नका ती जबाबदारी माझी आहे असे ते म्हणाले.
इस्माईल शेख म्हणाले की,माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी नेहमीच पिंपळगाव उज्जैनी गावच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला होता.आज सुमारे १६ कोटी रुपये खर्चून कापूरवाडी पिंपळगाव उज्जैनी पोखर्डी ते छत्रपती संभाजी नगर महामार्गा पर्यंत रस्त्याचे मजबुती करण्या चे काम पूर्ण होणार आहे.याचबरोबर विविध विकास कामासाठी देखील मोठा निधी दिला आहे.हा रस्ता सुमारे नऊ किलोमीटर अंतराचा असून या रस्त्यावरील सीडी वर्क देखील आहे.त्यामुळे या परिसरातील गावांचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे असे ते म्हणाले.

Show More
Back to top button
error: Content is protected !!