
वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज राजुरा
राजुरा:– राजुरा मुख्यालयापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या वरुर रोड येथे मागील अनेक वर्षांपासून अवैध दारू विक्री करणाऱ्यांनी चांगलेच बस्तान मांडले आहे. त्यामुळे गावातील वातावरण कलुषित होत असून शाळकरी विद्यार्थ्यांवर अनेक दुष्परिणाम दिसून येत आहेत, महिलांना सुद्धा याचा फार त्रास होतोय. कुटुंबीयांचे मोठे नुकसान होत होते. या गंभीर बाबी लक्षात घेऊन वरुड रोड येथील गुरुदेव सेवा मंडळाच्या महिलांनी आक्रमक पवित्रा घेऊन येथील अवैध दारू विक्री बंद पाडली. दरम्यान महिला शक्तींनी महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर रूद्रावतार धारण करून गावात रात्री उशिरापर्यंत धडक कारवाई करून अवैध विकी बंद पाडली.
यावेळी श्री. गुरुदेव सेवा मंडळ वरुर रोड च्या अध्यक्ष बेबीबाई धानोरकर यांच्या पुढाकाराने गुरूदेव सेवा मंडळाच्या महिला कार्यकर्त्यांनी दिवसभर व रात्री उशिरापर्यंत पहारादेवून ही मोहीम राबवली. तर गावातील ही अवैध दारू विक्री कायमस्वरूपी बंद करण्यासाठी पोलीस विभाग तसेच संबंधित विभागाने याविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.