
रविवार 16 मार्च 2025 रोजी दत्तनगर, गुजरवाडी रोड या ठिकाणी नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबीर तपासणी हे श्री साईप्रसाद हॉस्पिटल, अखिल दत्त नगर मित्र मंडळ व शिव शंभू प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने घेण्यात आले असून या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या 200 पेक्षा जास्त नागरिकांनी या आरोग्य शिबिरामध्ये सहभागी होऊन सहभाग नोंदवला आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील आजाराच्या तपासण्याचे आयोजन करण्यात आले होते.
त्वचेचे आजार, मधुमेह, मणक्याचे आजार, मुतखडा, मानसिक आजार, केस गळणे, कोंडा, पोटाचे विकार, वजन कमी करणे, हृदयाचे आजार, थायरॉईड, अनियमित झोप, आम्लपित्त, कंबर दुखी, मूळव्याध, भंगधरचे उपाय, संधिवात, सांधेदुखी, कर्करोग, सर्दी, खोकला, ताप, स्त्रियांचे पाळीचे आजार, अँलर्जी, दमा, लहान मुलाचे आजार, डोकेदुखी, गर्भाशयाची गाठ, ताण तणाव, हार्नियाचे उपाय, पॅरेलीसीस अथवा लकवा उपचार.