
अहिल्यानगर प्रतिनिधी राविराज शिंदे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त चोंडी येथे आज (दि. ६ मे) दुपारी साडेबारा वाजता मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ३६ कॅबिनेट, ५ राज्यमंत्री यांच्यासह विविध
विभागांचे सचिव, प्रशासकीय अधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
दोन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे दुपारी बारा वाजता हेलिकॉप्टरने चोंडी येथे आगमन होणार आहे. त्यांच्यासाठी पाच हेलिपॅड तयार करण्यात आली आहेत. तसेच वाहतुकीची गर्दी होऊ यासाठी वाहनतळ, नये, रुग्णवाहिका, २६५ फूट लांब आणि
१३२ फूट रूंद आकाराचा मंडप आहे. चोंडीत मान्यवरांच्या आगमनानंतर अहिल्यादेवींच्या स्मारकाला अभिवादन करून दुपारी १२:३० मंत्रिमंडळ बैठकीला प्रारंभ होईल. सुमारे दीड तास ही बैठक चालणार आहे. बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्री, आमदार, अधिकारी आणि इतर पाहुण्यांचा पाहुणचार होणार आहे.