
अहिल्यानगर प्रतिनिधी राविराज शिंदे,
पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत अवघ्या एकाच आठवड्यात तब्बल ११२ दारू व जुगाराच्या अड्डयावर कारवाई केली आहे. या कारवाईत ८ लाख २८ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून विविध पोलिस ठाण्यात एकूण ११२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटण करण्याच्या दृष्टीने अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.त्यानुसार आहेर यांनी दि. १ ते ७ मे २०२५ या कालावधीमध्ये स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार केल होती. या पथकाने अहिल्यानगर जिल्हयातील विविध पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध व्यावसायिकांची माहिती काढुन अवैध दारू विक्री चालणाऱ्या ९५ ठिकाणी छापे टाकुन ६ लाख ५० हजार २५५ रुपये किंमतीची अवैध देशी, विदेशी दारु तसेच तयार गावठी हातभट्टी व कच्चे रसायन नष्ट करुन महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार तोफखाना, एमआयडीसी, नगर तालुका, पारनेर, श्रीगोंदा, शेवगाव, नेवासा, पाथर्डी, श्रीरामपूर शहर, संगमनेर शहर, अकोले, राजूर, शिर्डी या दाखल जुगार, छापे शिर्डी, दाखल ७८
जप्त केला आहे.
पोलिस ठाण्यात एकुण ९५ गुन्हे करण्यात आले आहेत. तसेच मटका, बिंगो चालणाऱ्या ठिकाणी टाकुन नेवासा, एमआयडीसी, अकोले, राहुरी या पोलिस ठाण्यात १७ गुन्हे केले असून या कारवाईत १ लाख हजार २० रूपये किमतीचा मुद्देमाल
सदर कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर प्रशांत खैरे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.