
प्रेस नोट
पंढरपूर
श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजेची 28 जुलै पासून ऑनलाईन नोंदणी,सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर
दि. 01 ऑगस्ट ते 31 डिसेंबर, 2025 मधील पुजांची होणार नोंदणी, महानैवेद्य सहभाग योजनेचा देखील समावेश.
पंढरपूर (ता.24) – श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपुजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन पूजा, महानैवेद्य सहभाग योजना इत्यादी सर्व प्रकारच्या पूजा श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात. दि. 01 ऑगस्ट ते 31 डिसेंबर, 2025 या कालावधीतील पुजांची ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करण्याची सुरवात दि.28 जुलै रोजी स.11.00 पासून होत असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
याबाबत मंदिर समितीच्या दि. 15 जून रोजीच्या सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत निर्णय घेण्यात आला होता. यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
भाविकांना पूजेची नोंदणी https://www.vitthalrukminimandir.org या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येणार आहे.
यापूर्वी पहिल्या टप्प्यात दि. 7 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2024, दुसऱ्या टप्प्यात दि.1 जानेवारी ते 31 मार्च 2025 तसेच तिस-या टप्प्यात दि. 01 एप्रिल ते 31 जुलै 2025 या कालावधीतील श्रींच्या नित्यपूजा, तुळशी अर्चन पूजा व पाद्यपूजा ऑनलाइन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून व देशभरातून कर्नाटक, आसाम, आंध्र प्रदेश इत्यादी राज्यातील भाविकांनी पूजेची नोंदणी केली होती. यास भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आता, चौथ्या टप्प्यात दि. 01 ऑगस्ट ते 31 डिसेंबर, 2025 या कालावधीतील सण, उत्सव व गर्दीचे दिवस वगळून इतर दिवशीच्या श्रींच्या नित्यपूजा व पाद्यपूजा तसेच दि. 01 ते 31 ऑगस्ट, 2025 कालावधीतील तुळशी अर्चन पुजा व महानैवेद्य सहभाग योजना ऑनलाइन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ऑनलाइन नोंदणीसाठी काही अडचणी आल्यास मंदिर समितीच्या नित्योपचार कार्यालयातून नोंदणी करून देण्यास मदत व आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात येईल. याबाबतची अधिक माहिती, अटी व शर्ती मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी मंदिर समितीच्या 02186 -299299 या दूरध्वनी क्रमांकावर भाविकांनी संपर्क साधावा. याशिवाय पूजेचे बुकिंग मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच करावे कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीस संपर्क करू नये असे आवाहन कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी यावेळी सांगितले.
*चौकट*
श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीमातेच्या नित्यपूजेसाठी अनुक्रमे रु.25,000/-, रू.11,000/- तसेच पाद्यपूजेसाठी रू.5,000/- व तुळशी अर्चन पूजेसाठी रू.2100/- तसेच महानैवेद्य सहभाग योजनेसाठी रू.7,000/- इतके देणगी मुल्य आहे.
Vande bharat live tv news,nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015