A2Z सभी खबर सभी जिले कीमहाराष्ट्र

राम शिंदे ठरवणार जामखेड बाजार समितीचा उपसभापती, आज निवड जोरदार लॉबिंग: गोरे व घुमरे यांची नावे आघाडीवर

राम शिंदे ठरवणार जामखेड बाजार समितीचा उपसभापती, आज निवड जोरदार लॉबिंग: गोरे व घुमरे यांची नावे आघाडीवर

अहिल्यानगर प्रतिनिधी राविराज शिंदे भारतीय पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस BJAC .
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतिपदाची सोमवारी (११ ऑगस्ट ) निवड होणार आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी (१० ऑगस्ट) रात्री विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्यासोबत सर्व १२ संचालकांची बैठक झाली. प्रा. शिंदे हे सोमवारी सकाळी १० वाजता आपला निर्णय जाहीर करणार आहेत. बाजार बाजार समितीच्या १२ संचालकांपैकी नंदकुमार गोरे, सचिन घुमरे यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. सभापती शिंदे सोमवारी ऐनवेळी कोणाच्या गळ्यात उपसभापतिपदाची माळ घालतात, याकडे जामखेडकरांचे लक्ष लागले आहे.

विरोधी संचालक काय करणार?

रिक्त झालेल्या उपसभापतिपदासाठी सोमवारी निवडणूक होणार आहे. त्यासाठी विरोधी सहा संचालक बैठकीस उपस्थित राहणार का, हा खरा प्रश्न आहे. सत्ताधारी संचालक मंडळात कोणताच बेबनाव नसल्याने सभापती प्रा. राम शिंदे सांगतील तोच उपसभापती होणार आहे. त्यात नंदकुमार गोरे व सचिन घुमरे यांचे नाव आघाडीवर असल्याचे समोर येत आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती निवडीसाठी निवडणूक अध्यासी अधिकारी दिलीप तिजोरी यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समितीच्या सभागृहात सोमवारी सकाळी सर्व संचालक मंडळाची सकाळी ११ वाजता

ईश्वरी चिठ्ठीने ठरले होते पदाधिकारी

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या गटाला ९, तर आमदार रोहित पवार यांच्या गटाला ९ जागा मिळाल्या होत्या. ईश्वरी चिठ्ठीवर प्रा. शिंदे यांच्या गटाचे शरद कार्ले सभापती झाले, तर आ. रोहित पवार गटाचे प्रा. कैलास वराट हे ईश्वरी चिठ्ठीवर उपसभापती झाले होते. समसमान बलाबल असल्याने बाजार समितीचा कारभार हाकणे तारेवरची कसरत झाली होती.

तीन संचालक शिंदे गटात

बैठक होत आहे. सकाळी ११ ते ११:३० वाजता नामनिर्देशन पत्र दाखल करणे, पावणेबारा ते बारा छाननी, १२:१० वाजता यादी प्रसिद्ध करणे, व साडेबारा वाजेपर्यंत माघारीची मुदत असून, वेळ पडल्यास निवडणूक घेणे, अशी निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली आहे.

आ. रोहित पवार गटाचे तीन संचालक राहुल बेदमुथा, अंकुश ढवळे व नारायण जायभाय यांनी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय दोन महिन्यांपूर्वी घेतला होता. जुलै महिन्यात आ. रोहित पवार गटाचे कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव आणला. तो १२ विरुद्ध० मतांनी मंजूर

Back to top button
error: Content is protected !!