
प्रेस नोट
उमरगा प्रतिनिधी
उस्मानाबाद
स्त्री मुक्ती चळवळीला ५० वर्षे पूर्ण – उमरगा परिषदेत नवी उर्जा!
“स्त्री मुक्ती चळवळ ही फक्त आंदोलन नव्हती, ती महिलांच्या अस्तित्वाची क्रांती होती. आज पन्नास वर्षांनंतरही आपण या प्रवासाला नवी दिशा देत आहोत,” असे प्रतिपादन नारी अत्याचार विरोधी मंचच्या कार्यकर्त्या सुनीता बागल यांनी केले.
महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेच्या निमित्ताने उमरगा येथील शासकीय विश्रामगृहात १३ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित तालुका स्तरावरील विविध संघटनांच्या पदाधिकारी बैठकीत त्या बोलत होत्या.
१९७० च्या दशकात महाराष्ट्रात स्त्री मुक्ती चळवळीचा उदय झाला. सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक अत्याचाराविरोधात महिला एकवटल्या. हुंडाबळीविरोधी लढे, लैंगिक छळाविरोधी कायदे, कार्यक्षेत्रातील समानतेसाठीची मागणी, तसेच महिलांना शिक्षण व रोजगारात संधी देण्यासाठी झालेले संघर्ष – या सर्वांनी स्त्री मुक्ती चळवळीला दिशा दिली.गेल्या ५० वर्षांत महिलांनी आपल्या हक्कांसाठी मोठ्या प्रमाणावर लढे दिले. घटस्फोटित महिलांचे पुनर्वसन, पोटगी हक्क, घरगुती हिंसा प्रतिबंधक कायदा, महिला आरक्षण, तसेच पोक्सो कायदा यांसारखे अनेक महत्त्वाचे कायदे या संघर्षातून जन्माला आले.
बैठकीत बोलताना सुनीता बागल यांनी स्त्री मुक्ती चळवळीचा हा ऐतिहासिक प्रवास सांगत महिलांच्या आंदोलनातून झालेल्या बदलांचा आढावा घेतला.
“आजही ग्रामीण व शहरी भागातील महिला अस्तित्वासाठी झगडत आहेत. म्हणूनच चळवळीच्या पन्नासाव्या वर्षी आपण सर्व नारीवादी विचार मानणाऱ्या संघटनांनी एकत्र यायला हवे,” असे त्या म्हणाल्या.लोकप्रतिष्ठा धाराशिवच्या अॅड. सिमिता शहापूरकर यांनी पुढील वाटचालीवर मार्गदर्शन करताना, जिल्हानिहाय परिषदा घेऊन कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याची गरज व्यक्त केली.
जिजाऊ ब्रिगेडच्या रेखा सूर्यवंशी यांनी आपला संघर्ष मांडला, तर विभागीय कार्याध्यक्षा सुनंदाताई माने यांनी महिलांना चळवळीमध्ये सक्रिय होण्याचे आवाहन केले.बैठकीत मीनाक्षी दुबे (पोलीस मित्र संघटना), राऊ पाटील (वसंत भारती संस्था), सुनीता चावला, सरिता उपाशे, वंदना पाटील, वैशाली जाधव (तंटामुक्ती समिती उपाध्यक्षा), तसेच विविध महिला संघटनांचे पदाधिकारी, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.बैठकीत धाराशिव येथे होणाऱ्या परिषदेची तयारी व जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या.
रंजिता पवार (फाईट इन इक्वालिटी अलायन्स, इंडिया) यांनी प्रस्तावना केली तर आभार प्रदर्शन गिरीजा राठोड यांनी केले.स्त्री मुक्ती चळवळ पन्नासाव्या वर्षात पदार्पण करत असताना उमरगा परिषद ही महिलांच्या समानतेच्या व अस्तित्वाच्या नव्या लढ्याला दिशा देणारी ठरेल.
RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
Vande bharat live tv news,nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015
________________________________________














