या विद्यार्थ्यांच्या वाड़मय मंडळातून समाजाचे प्रश्न चव्हाट्यावर मांडणारे दर्जेदार साहित्यिक निर्माण होतील असा मला विश्वास आहे ! डॉ. विजयकुमार कस्तुरे.
या विद्यार्थ्यांच्या वाड़मय मंडळातून समाजाचे प्रश्न चव्हाट्यावर मांडणारे दर्जेदार साहित्यिक निर्माण होतील असा मला विश्वास आहे ! डॉ. विजयकुमार कस्तुरे.
प्रेस नोट
कळंब, यवतमाळ
या विद्यार्थ्यांच्या वाड़मय मंडळातून समाजाचे प्रश्न चव्हाट्यावर मांडणारे दर्जेदार साहित्यिक निर्माण होतील असा मला विश्वास आहे !
डॉ. विजयकुमार कस्तुरे.
कळंब (यवतमाळ)
नुकत्याच स्थानिक शिक्षण महर्षि ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात राष्ट्रभाषा हिंदी, मराठी आणि इंग्रजी या मूलभूत भाषांमधून त्रैभाषिक वाड़मय मंडळाची स्थापना करण्यात आली.या निमित्ताने आयोजित समारंभाचे हर्षोल्हासात उदघाटन मा. प्रा. डॉ. संजय कांबळे यांच्या हस्ते सुप्रसिध्द ज्येष्ठ कवी साहित्यिक तथा राज्य, राष्ट्रीय तसेच अंतर्राष्ट्रीय विविध पुरस्कारांचे मानकरी तथा अनेक संमेलनांचे अध्यक्ष असलेले डॉ. विजयकुमार कस्तुरे, चिखली यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले. याप्रसंगी शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रातील बरेच मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी डॉ. कस्तुरे यांनी वरील विधान केले.
प्रसंगाचे औचित्य साधून डॉ. कस्तुरे यांनी त्यांच्या इंग्रजी भाषेतील –
मॅटर पॅटर केअरफुली
हीअर व्हॉट इज सेड,
व्हॉट इज सेड,
व्हॉट इज सेड…..
सेव्ह दि डॉटर,
सेव्ह दि डॉटर,
मेक हर एज्यूकेटेड…..
या कवितेने सुरूवात करून बेटी बचाव बेटी पढाव चे बाळकडू पाजत-
सुंदर आमुची माय मराठी
मायबोली साजली !
सौंदर्याने नटली अवघ्या विश्वामधूनी गाजली !!
या काव्य गीताने सर्वांना खिळवून टाकीत देशातील बहुतांश प्रांतांमधील विविध साहित्य व कवी संमेलनातून दिल्ली ते अंतर्राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार मिळवणाऱ्या त्यांच्या –
त्या तरूच्या सावलीला
चल सखे बोलू जरा…..
ही कौटुंबिक सौहार्द सलोख्याचा संदेश देणारी
भावस्पर्शी कविता सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध करतानाच –
मी तू…..
छी थू…..!!
या माणसा माणसांमधील दुराव्याचे व वादांचे भयाण चित्रण करणाऱ्या साहित्य विश्वातील सर्वात छोट्या कवितेच्या रूपाने, आजच्या या भंपक ग्लोबल वातावरणात आपसातील संपुष्टात आलेली प्रेम आस्था कशी आवश्यक आहे हे ही पटवून दिले. आणि सोबतंच –
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची वास्तव गाथा स्पष्ट करणाऱ्या –
आजादी हिंदुस्थानकी
हो गयी पाऊनसौ सालकी !
जिसके लिये शहीदोने अपने
बली चढायी जान की…..
व –
मेघा…..
बरसोरे बरसोरे
के सारी दुनिया याद करे…..
ही पावसाच्या अवर्षणातील भयग्रस्त भीषणता सायना संगीत नजरेपुढे उभी करणारी अशा कविता स्वरबध्द पध्दतीने गाऊन सोहळ्यास स्वर संगीतमय साज चढविला.
या निमित्ताने डॉ. कांबळे सरांसह इतरही मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध साहित्यिक कथाकार डॉ. बबनराव महामुने, डॉ. डी. व्ही. खरात, प्राचार्य डॉ. हेमंत भगवान, उपप्राचार्य डॉ. के. डी. जाधव, भावकवी अंकुश पडघान, प्रा. जयंत भोसले तथा शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच रसिक प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादपूर्ण उपस्थितीने सोहळ्याची शोभा वाढविली. सदर उपक्रम संस्थेचे पदाधिकारी डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. प्रास्ताविक प्रा. डॉ. दादाराव गुंडरे, आभार प्रदर्शन डॉ. नितीन अंकुशराव तर दर्जेदार सूत्र संचालन प्रा. डॉ. दीपक सूर्यवंशी यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
Vande bharat live tv news,nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015









