A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेताज़ा खबरमहाराष्ट्र

महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालय मालेगाव येथे सायबर सुरक्षा या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

सायबर सुरक्षा अतिशय महत्वाची - डॉ. मनिष सोनवणे मालेगांव |

प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर मालेगाव : महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालय मालेगाव येथील महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉ. चंद्रकांत दिघावकर यांच्या मार्गदर्शनाने हिंदी संशोधन केंद्राकडून सायबर सुरक्षा या विषयावर अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले .
     याप्रसंगी आजच्या जगात, काही सुरक्षा धोक्यांमुळे आणि सायबर हल्ल्यांमुळे सायबर सिक्युरिटी खूप महत्त्वाची आहे. आपल्या कंपनीची माहिती चोरी होण्यापासून वाचण्यासाठी अनेक कंपन्या सॉफ्टवेअर विकसित करतात. हे सॉफ्टवेअर तुमच्या माहितीचे संरक्षण करते. सायबर सुरक्षा महत्त्वाची आहे .कारण ती केवळ माहितीच नाही तर आपल्या सिस्टमला व्हायरसच्या हल्ल्यापासून सुरक्षित ठेवण्यास मदत करते, असे उद्गार महाविद्यालयाचे उपप्राचार्य मा. डॉ. मनिष सोनवणे यांनी काढले .
      प्रमुख अतिथी प्रा . कोमल शिंदे (संगणक विभाग, म स. गा महाविद्यालय यांनी सायबर सिक्युरिटी या विषयावर अतिशय सखोल व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले याप्रसंगी त्यांनी अनेक दाखले देत विद्यार्थ्यांनी आणि विशेषतः विद्यार्थिनींनी सोशल मीडिया चा वापर करत असतांना कशाप्रकारे सावध राहिले पाहिजे याची माहिती सांगितली . त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की संगणक, इंटरनेट, मोबाईल किंवा इतर तांत्रिक उपकरणे इत्यादींचा वापर करून एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या गटाकडून तुमच्या माहितीशी छेडछाड करणे याला सायबर क्राईम किंवा सायबर गुन्हा म्हणतात. असे हे हल्लेखोर सायबर गुन्हे करण्यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून असंख्य सॉफ्टवेअर आणि कोड वापरतात. तसे पाहिले गेले तर जगात अमेरिका आणि चीननंतर भारतात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे सर्वांनी खूप सावध राहून सोशल मीडिया चा वापर केला पाहिजे . जर आपला मोबाईल हरवला तर सर्वात आधी पोलीस स्टेशनला त्याची तक्रार दाखल केली पाहिजे.

Back to top button
error: Content is protected !!