?php echo do_shortcode('[t4b-ticker]'); ?
A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरे

मनविसेच्या पाठपुराव्याला यश – नायगाव येथील व्यायाम शाळेत अखेर आले साहित्य!

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]

IMG 20250725 WA0167नायगाव, ता. यावल (जि. जळगाव) – सन 2017 मध्ये बांधकाम पूर्ण झाल्यानंतर साहित्याअभावी बंद असलेली नायगाव येथील व्यायाम शाळा अखेर सुरु होण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष कल्पेश राजेंद्र पवार यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, दिनांक 24 जुलै 2025 रोजी तब्बल ₹6 लाखांचे क्रीडा साहित्य नायगाव व्यायाम शाळेत दाखल झाले आहे. ही बाब उल्लेखनीय ठरते की, दिनांक 02 जून 2025 रोजी कल्पेश राजेंद्र पवार यांनी नायगाव ग्रामपंचायतीकडे अधिकृत निवेदन दिले होते. त्यानंतर जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. विजय कुलकर्णी यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधून सदर मागणीची नियमितपणे पाठपुरावा करण्यात आली. त्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आणि सहकार्यामुळे ही गरज पूर्ण झाली. IMG 20250725 WA0166

मनविसेचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष कल्पेश पवार म्हणाले “हा विजय हा केवळ माझा नाही तर संपूर्ण नायगाव ग्रामस्थांचा आहे. युवकांना सशक्त बनवण्यासाठी व्यायाम शाळेचा उपयोग होईल, हीच अपेक्षा आहे. या कामात सहकार्य करणाऱ्या सर्व संबंधितांना मी मन:पूर्वक धन्यवाद देतो.”

विशेष धन्यवाद –

जिल्हा क्रीडा विभागीय अधिकारी श्री. विजय कुलकर्णी साहेब नायगांव ग्रामपंचायत सरपंच व ग्रामविकास अधिकारी मनविसेच्या प्रयत्नामुळे अनेक वर्षे रखडलेला विषय मार्गी लागला असून, आता नायगाव येथील युवकांना दर्जेदार व्यायाम सुविधा उपलब्ध होणार आहेत.

 

Back to top button
error: Content is protected !!