पुणेः मनसेचे पुण्यातील उमेदवार जाहीर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीसाठी ४५ उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली. त्यामध्ये कोथरूड मधून किशोर शिंदे, हडपसर मधून मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि खडकवासला मतदारसंघातून मयुरेश रमेश वांजळे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. विधानसभा निवडणुक मनसे स्वतंत्रपणे लढणार असल्याचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची ४५ उमेदवारांची दुसरी यादी मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी जाहीर केले आहे