संजय पारधी चंद्रपूर, महाराष्ट्रा
राजुरा ,कडोली : ज्ञान ज्योती कॉमेंट स्कूल कडोली यांच्यातर्फे 31 जानेवारी ला नृत्य संमेलनचे भव्य आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात भारत माता व सरस्वतीच्या प्रतिमेच्या प्रतिमेला पुष्पहार व प्रतिमेजवळ प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिजाऊ बहुउद्देशीय संस्थेचे माजी संस्थापक नलिनीताई सज्जनवार प्रमुख अतिथी कडोलीचे सरपंच श्री. शैलेशजी चटके कडोलीचे माजी सरपंच श्री. राकेश जी हिंगाने जिजाऊ फाउंडेशन संस्थेचे सचिव सौ. प्रीती सज्जनवार कोषाध्यक्ष श्री. विलासची श्रीगंधेवार, ज्ञानज्योती कॉन्व्हेंट स्कुलचे संस्थापक श्री निलेशजी सज्जनवार , वैभव चिताळे या मान्यवरांची उपस्थिती होती शिक्षकांतर्फे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले ज्ञानज्योती कॉन्व्हेंट स्कूलच्या संस्थापक द्वारे प्रस्तावना करण्यात आली शाळेतील सर्व शिक्षकांना या कार्यक्रमाचे संचालन रुपेश श्रीरामवार व कोमल गाउत्रे मॅडम यांनी केले सर्व गावातील लोकांचा खूप छान प्रतिसाद मिळाला व मुलांनी पण रंगमंचावर आपला नृत्य खुप सुंदर सादर केला या कार्यक्रमांमध्ये सर्व शिक्षकांनी चांगली जबाबदारीने काम केले व कार्यक्रमांमध्ये कसलेही अडथळे निर्माण न होता सुरळीत हे कार्यक्रम झाले या कार्यक्रमाला गावातील सर्व लोकांनी वाह वाह केली आणि तसेच कार्यक्रम घेत राहावे म्हणून गावातील सर्व लोकांनी म्हटले याच प्रकारे सर्व श्रेय हे या शाळेतील शिक्षकांना जातात कारण ते मुलांना नृत्य शिकवण्यापासून तर नृत्य सादर करण्यापर्यंत असतो अशा शिक्षकांचे सहयोग मिळणारे रुपेश श्रीरामवार, पायल पेरकांनदे, श्रद्धा भलमे, वैष्णवी देवाळकर , कोमल गाउत्रे , स्नेहल करडभुजे, प्रियंका बनकर ,धनश्री इटणकर , माधुरी मुसळे ,सरिता लांडे मॅडम अर्चना ताई लोणारे यांचा समावेश होता