
समीर वानखेडे:
“महाराष्ट्राचे अर्थमंत्री श्री. अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनात आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे याच्या सहकार्याने आज सादर केलेला अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने जनताभीमुख असून महाराष्ट्राच्या प्रगतीला गती देणारा आहे.” अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
श्री मुनगंटीवार म्हणाले की, सर्वसमावेशक आणि राज्याच्या प्रगतीला चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे. कृषी, शिक्षण, आरोग्य, उद्योग, दळणवळण आणि पर्यावरण या सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांना दिलेले प्राधान्य स्वागतार्ह आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील प्रत्येक घटकाच्या विकासाचा विचार करून घेतलेले निर्णय निश्चितच महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिशादर्शक ठरतील. या सकारात्मक आणि दूरदृष्टी असलेल्या अर्थ संकल्पाचे मी स्वागत करतो व अर्थमंत्र्यांचे अभिनंदन करतो.